व्हन्नूर ता.कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत व्हन्नूर यांच्या संयुक्त विद्यमाने जलप्रदूषण रोखण्याच्या व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा निर्माल्य दान उपक्रम साजरा केला जातो.
- SUPPORT 10 WLAN DEVICES: This powerful device can support 10 Wi-Fi devices, which means you can enjoy Wi-Fi with your fa…
- ASR1803S CHIPSET: Integrated with ASR1803S CHIPSET chipset, supports all SIM & provides sophisticated blend of speed, in…
- FAST SPEED 4G LTE DATA CARD: You will get up to 150Mbps download speed, and up to 50Mbps upload speed depending on the N…
निकम विद्यालय व ग्रामपंचायत,व्हन्नूर यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व होणाऱ्या जलप्रदूषणाचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी १००% निर्माल्य दान केले.

गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते अशा ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर व ग्रामपंचायतची घंटागाडी उभा करण्यात आली होती.
या निर्माल्यदान उपक्रमावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा मोरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप लोंढे,भगवान निकम,ग्रामसेवक बशीर मुजावर,चंद्रकांत यादव व या उपक्रमाच्या विभाग प्रमुख एन.सी.यादव तसेच सार्थक हजारे,रत्नदिप हजारे,शिवराज हजारे हे निवडक विद्यार्थी उपस्थित होते. या दान केलेल्या निर्माल्यातून सेंद्रिय खताची निर्मिती होत असल्याचे पाहून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.