गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल होत असल्याने महिला सन्मान परिषदेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कागल-सातारा विभागाला निवेदन दिले आहे.
परिषदेच्या मते, महामार्ग रुंदीकरणाच्या कामात मा. तहसीलदारांच्या परवानगीशिवाय झाडे तोडली जात आहेत ?. यामुळे प्रदूषणाची समस्या वाढत आहे. याबाबत उप महाप्रबंधक व प्रकल्प संचालकांशी चर्चा करण्यात आली असून, तोडलेल्या झाडांच्या बदलीत पुनर्रोपण करण्यासाठीचा आराखडा मागण्यात आला आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, महिला सन्मान परिषदेने प्रलंबित असलेल्या पुलांचे व बोदग्यांचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणीही केली आहे.
महिला सन्मान परिषदेच्या वतीने निवेदनात म्हटले आहे की, महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो झाडे तोडली जात आहेत,
मा. तहसीलदारांच्या परवानगीशिवाय झाडे तोडली जात आहेत, यामुळे प्रदूषणाची समस्या वाढत आहे, तोडलेल्या झाडांच्या बदलीत पुनर्रोपण करण्यासाठीचा आराखडा मागण्यात आला आहे, प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे, प्रलंबित असलेल्या पुलांचे व बोगद्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणीही केली आहे.
निवेदन देताना प्रियाताई शिरगावकर (अध्यक्षा), सीमा कांबळे (संघटक), समिना शेख, प्राजक्ता कांबळे, पाकिजा तहसिलकर, किरण कांबळे, सलीम शेख उपस्थित होते. त्याचबरोबर, नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.