मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता.कागल जिल्हा कोल्हापूर येथील धनगर समाजाचे मेंढपाळ सिध्दू दिवटे यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र यशवंत ब्रिगेड संचलित मेंढपाळ सेनेच्या, महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मान. प्रा. डॉ. संतोष कोळेकर ( सर ) यांनी दिले व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मा. श्री. सिध्दू दिवटेसो यांची यशवंत ब्रिगेड संचलित मेंढपाळ सेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे.
यावेळी यशवंत ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मान. प्रा. डॉ. संतोष कोळेकर ( सर ) , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अमोल गावडे ( पत्रकार ) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. प्रकाश पुजारी, धनगर समाज सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा. रावसो रानगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. कैलास काळे, मा. प्रकाश गोरड, मा. शिवाजी रानगे, मा. सोमनाथ पुजारी, मा. शंकर जानकर, मा. अनिल बनकर, मा. मल्हार येडगे, डॉ. प्रथमेश हराळे, मा. सुजित बंडगर, मा. विजय अनुसे, मा. नामदेव लांबोर, मा. योगेश देवकुळे, मा.संदीप हजारे, मा. बाळासाहेब कोळेकर, मा. सीमा झोरे, मा. मेघा गावडे, मा. स्वाती वाघमोडे, मा. विद्या लवटे, मा. सुजाता नाईक, मा. संगीता शेळके तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.