सिद्धनेर्ली, ता. ७ : बामणी ता कागल येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आज ७ जानेवारी १९३२ रोजी पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण‘ प्रकाशित केले त्यामुळे आज मराठी पत्रकार दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. सिद्धनेर्ली परिसर पत्रकार संघाच्या वतीने गणेश मंदिरासमोरील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सदस्यांसह गुणवंत विद्यार्थी, नागरिक यांचा पुस्तके देऊन सत्कार केला. जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अनुराधा पाटील यांच्या हस्ते केले.
यावेळी सरपंच सौ.पाटील सर्व सदस्य, पुरस्कार प्राप्त सर्पमित्र भिमराव शिंदे, पदोन्नतीबद्दल सुभाष कोईगडे, पशुसेवेबद्दल गोविंद पाटील, मैथीली मगदूम, पियुष मगदूम ,उज्वला पाटील यांचा सत्कार केला. सरपंच अनुराधा पटील, राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील, सी एस पाटील, पत्रकार शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
रवींद्र पाटील, चंद्रकांत निकम, प्रमोद पाटील,आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पंडीत कोईगडे यांनी केले.सुत्रसंचलन भीमराव शिंदे यांनी केले. आभार विजय पाटील यांनी यांनी मानले.
[ays_poll id=”4″]