श्री. प. बा. पाटील सायन्स अकॅडमी  मुदाळमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या जेईई, नीट व MHT- CET परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुदाळ येथील परशराम बाळाजी पाटील सायन्स अकॅडमीमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील होते.

Advertisements

संस्थेचे संस्थापक के. पी पाटील म्हणाले, मी राजकारणी व्यक्तीआहे.मी आमदार म्हणून दहा वर्षे काम केले. बिद्री सहकारी साखर कारखान्याचा गेले ३५ वर्षे  संचालक आहे, तसेच २५ वर्षे चेअरमन आहे  कोल्हापूर जिल्हा बँकेचा संचालक म्हणून ३५ वर्षे काम केलं.विविध ठिकाणी चेअरमन, संचालक म्हणून काम केलं परंतु सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे माझ्या प्रशालेतील मुले मोठ्या प्रमाणातआज यशस्वी झाली आहेत. याचा मला अभिमान वाटतो. हीच मुले उद्या मोठ मोठ्या पदावर रुजू होतील आणि  मी प बा चा विद्यार्थी आहे अशी सांगतील तेंव्हा माझा उर भरून आल्याशिवाय रहाणार नाही .

Advertisements

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष एम.एस. पाटील , प्राचार्य रणजितसिंह पाटील, उपमुख्याध्यापक टी एम रेडेकर, विभागप्रमुख प्रा एन एच पाटील , समन्वयक प्रा व्ही बी मोरे, प्रा आय बी वरुटे, बिद्री कारखाना कामगार युनियन चे अध्यक्ष संजय मोरबाळे,लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक संतोष मोरबाळे, राजू चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक व्ही. बी मोरे यांनी केले सुत्रसंचलन सौ. हुजरे यांनी केले.आभार एन एच पाटील यांनी मानले.

अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश
MHT – CET मध्ये तब्बल 63 विद्यार्थ्यांनी 95 परसेंटाईलपेक्षा जास्त तर  93 विद्यार्थ्यांनी 90 परसेंटाईलपेक्षा जास्त गुण मिळवले.या वेळी IIT साठी पात्र झालेल्या व नीट मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!