शिवराज विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघराज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर )

         सावर्डे ( जि- रत्नागिरी) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट स्पोर्टस् अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या १६ वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत येथील राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबमध्ये सराव करणाऱ्या शिवराज विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांकाचा एसव्हीजेसीटी चषक पटकावला.

          अंतिम सामन्यात वाई संघाचा १५-३, १५-७ अशा गुणफरकांनी पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापूर्वी शांतिनिकेतन सांगली संघाचा २-१ सेटनी,  कसबे डिग्रज सांगली संघावर २-१ सेटनी मात केली. तर एसव्हीजेसीटी डेरवन संघाचा १५-७, १५-८ अशा गुणांनी पराभव केला.

Advertisements


           या संघात संस्कार हासबे ( कर्णधार), अथर्व मेटकर, श्रेयस भारमल, विराट पाटील, साई भराडे, तन्मय खैरे, विश्वजित कांबळे, विनीत परीट, पार्थ महाजन, पियुष घोटणे, अंशराज कांबळे, सार्थक कांबळे यांचा समावेश होता.
           राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबमध्ये सराव करणाऱ्या या खेळाडूंना व्हॉलीबॉल प्रशिक्षक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर, तसेच क्रीडाशिक्षक व कोजिमाशि संचालक एकनाथ आरडे, संभाजी मांगले, अजित गोधडे, विनोद रणवरे, सुहास भारमल, अमित साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले. तर शिवराजचे प्राचार्य व्ही बी खंदारे, उपमुख्याध्यापक पी पी सुर्यवंशी यांचे प्रोत्साहन लाभले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!