मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गारगोटी आगारचे चालक शशिकांत मारुती बरकाळे यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागामार्फत गेली 25 वर्षे विना अपघात एसटी चालवल्याबद्दल उत्कृष्ट एसटी सेवा चालक म्हणून त्यांचा महामंडळातर्फे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख पारितोषक 25 हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला.
बरकाळे हे गेली 25 वर्षे गारगोटी आगारात चालक म्हणून काम पाहत आहेत. या सेवेत त्यांनी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, पंढरपूर, गोवा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग आदींसह प्रतिवर्षी शाळांच्या शैक्षणिक सहली विना अपघात प्रवासांचा सुखरूप प्रवास केला आहे . हरहुन्नरी व प्रेमळ स्वभावाने ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. या यशाबद्दल त्यांनी आई हिराबाई मारुती बरकाळे यांच्यासह तीन भाऊ स्मृर्तीस्थान असल्याचे त्यांनी गहिनीनाथ समाजाची बोलताना व्यक्त केले.