श्रीकृष्ण विकास संस्थेच्या चेअरमनपदी शरद चव्हाण

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारी श्रीकृष्ण विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी शरद बाबुराव चव्हाण यांची तर व्हा. चेअरमन पदी सौ. सरिता कुमार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडी संपन्न झाल्या. दरम्यान सभेपूर्वी संस्थेचे ज्येष्ठ संचालक कै. धोंडीराम चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेमध्ये नामदार मुश्रीफ यांची सत्ता आहे.यावेळी नूतन संचालक यांचाही सत्कार करण्यात आला.

Advertisements

यावेळी बोलताना नूतन चेअरमन शरद चव्हाण म्हणाले , संस्था वाढीसाठी प्रयत्न करून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करणार.
निवडी दरम्यान नूतन संचालक विश्वास पाटील, मुजाहिद कोल्हापुरे, जयसिंग घाटगे, समीर शेख, बशीर शेख, शिवाजी डूग्गे, रामराव भोसले, संजीव आवळे, आनंदा धनगर, विक्रांत कोरे, सौ. विमल पाटील आदी उपस्थित होते. आभार संस्थेचे सचिव कृष्णात चव्हाण यांनी मानले.

Advertisements
DS patsanstha
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!