मुरगूड ( शशी दरेकर ):
मुरगूड शहरातील प्रमुख बाजारपेठेसह, गणेश मंदिर, बँक ऑफ इंडिया परीसर आदी विविध भागात पिसाळलेल्या कुत्र्याने काल सोमवारी सायंकाळी व आज मतदान प्रक्रिया सुरू असतानाच धुमाकुळ घालत आकराजनांचा चावा घेऊन जखमी केले. त्यामध्ये अबाल वृद्धांचा समावेश आहे. माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यानीं ग्रामिण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
जखमींमध्ये-
विठ्ठल दशरत वायदंडे ( १४ ),
विश्वजीत उमाजी वायदंडे ( २२ ),
आशिष बाळासाहेब देवळे ( २८ ) ,
कमल रघुनाथ सूर्यवंशी ( ७५ ),
राजाराम बळवंत कडवे ( ६०),
नंदिनी गजेंद्र भोसले ( १४),
कमल तानाजी चित्रकार ( ४२), यांचा समावेश आहे. कांही जणांचा जोरदार चावा घेतल्यामुळे अख्या मुरगूडभर भीतीचे वातावरण पसरले होते
जखमीना येथील ग्रामीण रुग्नालयात उपचार करण्यात आले. मंगळवारी स्थानिक नागरीकांनी कुत्र्याला मारलेचे समजते नंतर शहरवासिय भय मुक्त झाले.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शहरवासियातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शहरवासियातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

