मुरगुड / वार्ताहर : येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या सायन्स विभागाची विद्यार्थिनी साक्षी अशोक गोरूले हिची पुढील महिन्यात सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय तायक्वान-दो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महावीर कॉलेज कोल्हापूर येथे झालेल्या ज़िल्हास्तरीय तायक्वान-दो स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटामध्ये ४६ ते ४९ वजनगटात तीने अजिंक्यपद पटकावल्याने तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्ह्यातील अनेक स्पर्धक खेळाडूंना हरवत साक्षिने प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये ती कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
तिला तायक्वांदो प्रशिक्षक अजित पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, अँड. वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य पी. डी. माने, उपप्राचार्य रवींद्र शिंदे, वडील अशोक गोरुले यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
Wow, fantastic blog format! How long have you ever been running a blog for?
you made running a blog look easy. The full look of your website is
wonderful, let alone the content! You can see similar here sklep online