आडी (राजकुमार पाटील): बेनाडी तालुका निपाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या कु. प्रथमेश सूर्यकांत पाटील याने शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये 52 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकाविले.
सीआरसी पातळीवरील त्यानंतर तालुका जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. प्रत्येक ठिकाणी कुस्तीमध्ये आपले विशेष कौशल्य दाखवून प्रथमेश पाटीलने राज्य पातळीवरील मुधोळ (जिल्हा बागलकोट) येथे नुकताच झालेल्या कुस्ती स्पर्धेत भरघोस यश संपादन करून शाळेच्या गावच्या नावलौकिका भर घातली आहे. प्रथमेश चे वडील कामानिमित्त बेनाडी येथे राहतात त्यांचे मूळ गाव बाणगे तालुका कागल आहे. निपाणी परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे.