मुरगुड ( शशी दरेकर ) : सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय शासकीय बॉक्सिंग स्पर्धेत येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या ६ जणांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय बॉक्सिंग स्पर्धेत अजिंक्यपद पटकावणाऱ्या ‘शिवराज’च्या सहा जणांना सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठीची संधी मिळणार आहे. विभागीय स्पर्धेमध्ये शिवराजचे हे खेळाडू आपापल्या वजन गटात कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल शाळेमध्ये सत्कार करण्यात आला.
विजेत्या खेळाडूंची नावे अशी-
14 वर्षाखालील वयोगट -मयूर प्रकाश अस्वले (32 किलो- प्रथम क्र.), सोहम सचिन जाधव (36 किलो- प्रथम क्र.) राजवीर कृष्णात जाधव (38 किलो- प्रथम क्र.), ताहीर भोला शिकलगार (४० किलो-प्रथम क्र.).तसेच या स्पर्धेत ‘शिवराज’च्या यश बाबासो जाधव 32 किलो वजन गटात उपविजेतेपद पटकावले.
17 वर्षाखालील वयोगट – आदित्य अनिल दिवटे (80 किलो प्रथम क्र.)
या सर्व खेळाडूंना संस्थेचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, विश्वस्त अॅड. वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य पी. डी. माने, उपमुख्याध्यापक प्रा. रवींद्र शिंदे यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक एकनाथ आरडे व प्रशिक्षक ओंकार सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.