शाहू मार्केट यार्ड परिसरात कलम 144 लागू

कोल्हापूर, दि. 8 : माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, हमाल व सभासद यांच्या जिवीताला व सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याची अथवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा संभव असल्याने प्रतिबंध व्हावा, यासाठी करवीरच्या कार्यकारी दंडाधिकारी शितल मुळे-भामरे यांनी फौजदार प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 अन्वये गुळ मार्केट मधील विष्णु शंकर रेडेकर, सुभाष बळवंत यादव, प्रकाश गुंगा खाडे, प्रकाश हरी पाटील, सुभाष तानाजी पाटील, युवराज सर्जेराव पाटील, रंगराव मारुती पाटील, मानसिंग गणपती आरंडे, मारुती बंडू पाटील, सुरेश माने, बाबुराव शंकर खोत तसेच संबंधित माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, हमाल व सभासद यांना दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर व त्याच्या 200 मीटर परिसरात प्रवेश करण्यास सी. आर. पी. सी. 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे.

Advertisements

श्री शाहू मार्केट यार्डमधील गुळ व्यापारी/ अडत दुकानात काम करणारे माथाडी कामगार, हमाल विष्णु शंकर रेडेकर, सुभाष बळवंत यादव, प्रकाश गुंगा खाडे, प्रकाश हरी पाटील, सुभाष तानाजी पाटील, युवराज सर्जेराव पाटील, रंगराव मारुती पाटील, मानसिंग गणपती आरंडे, मारुती बंडू पाटील, सुरेश माने, बाबुराव शंकर खोत तसेच माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी गुळ मार्केट बंद ठेवून व्यापारी/ अडत दुकानदार व शेतकरी यांची अडवणूक करत आहेत.

Advertisements

तसेच काम बंद केल्यामुळे व्यापारी / अडत दुकानदार व शेतकरी यांचे नुकसान होणार आहे. नुकसानीच्या अनुषंगाने काम चालू ठेवावे असे समितीने सांगूनही त्यांनी विनंती धुडकावून लावली आहे. तसेच जे माथाडी कामगार काम करण्यास तयार आहेत त्यांनाही काम करण्यास प्रतिबंध करीत आहेत.

Advertisements

तसेच दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी श्री शाहू मार्केट यार्ड मधील समिती कार्यालयात बैठक घेवून गुळाचे नुकसान होत असल्याने काम चालू करण्याबाबत सांगितले असता संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधीनींनी मान्य न करता बैठकीतून निघून गेले.

या माथाडी कामगार संघटनेमुळे बाजार आवारात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती अवलोकनी घेवून गुळाचे नुकसान होवू नये व व्यापारी / अडत दुकानदार व शेतकरी यांचे आर्थिक नुकसान होवू नये व मार्केट मध्ये असंतोष पसरुन गंभीर परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!