सावर्डे बु॥ येथिल साईबाबा मंदिराचा २३ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी

वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे बु॥ ( ता. कागल ) येथिल “ओमसाई” मंदिराचा २३ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. २६ / १२ / २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. साईबाबांच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेने हा वर्धापनदिन व साईबाबाचा भंडारा भक्तीभावाने साजरा होत असून त्यानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Advertisements

      शुक्रवार दि.२६ / १२ / २०२५ रोजी सकाळी ५.३० ते ६.०० श्रींचा अभिषेक व महापूजा  सकाळी
६.०० ते ७.०० श्री साईंचा अभिषेक महापूजा व आरती सकाळी ८.०० ते ९.०० पर्यंत साईबाबांचा सामुदायिक जप, सकाळी ९.०० ते १०.०० पर्यंत श्री सत्यनारायण महापूजा सकाळी ११.०० ते ११.३० साईबाबांची महाआरती व श्रीनां नैवद्य अर्पण आणि भडगांव येथिल विठ्ठलपंथी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी ११.३० ते ३.३० पर्यंत साईभंडारा व महाप्रसाद, सायंकाळी ७.०० ते ७.३० साईबाबांची महाआरती, रात्री ८.०० ते ११ .०० वाजेपर्यंत

Advertisements

मेतके येथिल अंबिका भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  
या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा साईभक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मण निकम व परिवार तसेच साईभक्त  गणेश मंडळ यानीं केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!