मुरगूडच्या सानिका स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने रणवरे कुंटुबाला साहित्यरूपी मदत

मुरगूड ( शशी दरेकर ): वाढदिवसाचा येणारा खर्च टाळून वेगळ्याच पद्धतीने आर्थिक मदत मुरगूड शहरामधील  ज्ञानेश्वर कॉलनी येथे श्रीमती अरुण अनिल रनवरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला होता.

सोने दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. हातावरील पोट असणाऱ्या रणवरे कुटुंबाच्या घरामध्ये चोरी झाल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्यामुळे सानिका स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने त्यांना दोन महिन्यांचा शिधा देण्यात आला.

Advertisements

सानिका स्पोर्टस् फौंडेशनचे अध्यक्ष रतन जगताप व प्रमोद रामाने यांचा वाढदिवस असल्यामुळे वाढदिवस बाजूला ठेवून त्यांनी जो येणारा खर्च टाळून रणवरे कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून देण्यात आली.

Advertisements

यावेळी राष्ट्रीय पंच मा.मारुती उर्फ बट्टू जाधव सानिका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दगडू शेणवी ,पत्रकार राजू चव्हाण, रतन जगताप मेजर, निशांत जाधव,रणजित बरकाळे, जगदीश चितळे, अभिजित कांबळे, शरद चौगुले आदि मान्यवरांच्या उपस्थितीत ही  मदत रणवरे कुटूंबानां सूपुर्त करण्यात आली.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!