ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड मध्ये परत एकदा ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी ठरला. या आधी मुरगूड शहरात असाच एक १ कोटीचा मानकरी झाला असून मुरगूड शहरात हि दुसरी वेळ आहे १ कोटीचे बक्षीस जिंकण्याची. यावेळी सक्षम कुंभार हा विद्यार्थी ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी झाला आहे.
सक्षम बाजीराव कुंभार इयत्ता ७ वी मध्ये शिकत असून त्याने भारत विरुद्ध न्यूझीलँड च्या तिसर्या एक दिवशीय सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन मध्ये संघ बनवला होता त्या संघास त्याला १ कोटीचे बक्षीस मिळाले. बक्षीसाची रक्कम त्वरित त्याच्या बँक खात्यात जमा झाल्यावर त्याच्या कुटंबीयांनी व मित्र परिवार यांनी जल्लोष केला.