मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे ( ता. कागल ) येथील श्री . साईबाबा मंदीराचा २०वा वर्धापनदिन व साई भंडारा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
भंडारा उत्सवानिमित्त परमा ब्धिकार परमात्मराज महाराज यांच्या हस्ते साई पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर साई मंदीर ते दत्त मंदीरपर्यंत पालखी सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात श्री साईंच्या भक्ती गीते गायिली. उत्साही व भक्तीभावात निघालेल्या पालखी मिरवणूकीत हजारो साईभक्त सहभागी झाले होते.
शुक्रवारी सकाळी श्रींचा अभिषेक व महापूजा .आरती , साईबाबांचा सामुदायीक जप ‘ सत्यनारायण महापूजा ‘ साईबाबांची महाआरती ‘ महानैवेद्य अर्पण व महाप्रसाद असे विधीवत कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. सांयकाळी मसोबा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यास आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत साई पुजारी लक्ष्मण निकम व त्यांच्या परिवाराने भक्तीभावाने केले. पालखी मिरवणूकीस परिसरातील साईभक्त हजर होते.