लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिकसाहेब यांचे मानसपुत्र व शिवराज विद्यालायाच्या आद्य शिक्षिका स्वर्गीय विजयमाला मंडलिकबाई यांचे लाडके विद्यार्थी म्हणून ओळखले जाणारे मंडलिक गटाचे एकनिष्ठ शिलेदार कुटुंबाशी अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठेने व समर्पित भावनेने कार्यरत असलेले संयमी व प्रेमळ व्यक्तिमत्व साताप्पा शिवाजी हळदकर ( वय ७५ ) आज काळाच्या पडद्याआड गेले.
Advertisements
अलीकडे ते आजारी होते. आजारपण वाढत गेल्यानंतर त्यांना काही महिन्यापूर्वीच चिमगांव येथील त्यांच्या मूळनिवासी हलवण्यात आले होते. गेली आठ दिवसापासून त्यांनी अन्न पाणी सोडले होते यातच आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Advertisements

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन २४ / १२ / २०२५ रोजी ९ वाजता चिमगांव येथे आहे.
AD1