
कोल्हापूर (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (MAKH) आणि न्यु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत न्यु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक), शांतीनगर, उंचगाव कोल्हापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 25 पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे 635 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरीता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. रोजगार मेळाव्यास उमेदवारांना मार्गदर्शन करण्याकरिता औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील उपस्थित राहणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswavam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 5 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे, असेही श्री. करीम यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यास उमेदवारांसाठी मोफत बस सुविधा
उंचगाव येथे होणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास येणाऱ्या उमेदवारांना मेळाव्याच्या ठिकाणी येण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर येथून न्यु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक), शांतीनगर, उंचगाव पर्यंत एनआयटी कॉलेजमार्फत मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर बाहेरच्या आवारात सकाळी 9.30 ते सकाळी 10.30 पर्यंत मोफत बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून या बस सेवेचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
बस क्रमांक व वाहनचालकाचे नाव खालील प्रमाणे आहे.
1) MH-09-CV0493 श्री. रविंद्र वातकर 7058918604
2) MH-09-GJ-3068 श्री. महेश सुतार 9595590995
3) MH 09-GJ-3072 श्री. किरण दाभोळे – 9145665380
4) MH 09-GJ-3073 श्री. अनिकेत साठे – 9637976868 याप्रमाणे आहे.