कागल : कंत्राटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एस टी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढायचा प्रयत्न करणाऱ्या कागल आगार व्यवस्थापकाचा डाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षा कडून मोडीत काढला, पुन्हा असा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यात एकही एस टी. बस सुस्थितीत राहणार नाही असा जिल्हाध्यक्ष मा. उत्तम कांबळे (दादा) यांचा कागल आगार प्रशासनाला सज्जड इशारा दिला. गेले कित्येक दिवस आपल्या न्याय हक्कासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला पण त्यांच्या मागण्या मान्य होण्याऐवजी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जबरदस्ती हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असाच प्रकार आज कागल आगार व्यवस्थापकाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आगारातील एसटी बस रस्त्यावर उतरवल्या हा प्रकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष मा. उत्तम कांबळे (दादा) यांच्या निदर्शनास आला त्यांना समजतात त्यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन स्टाईल ने आक्रमक आंदोलन करून स्टँड आवारातील बस परत आगारामध्ये पाठवल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम (दादा) म्हणाले की आपल्या न्याय हक्कासाठी गेले कित्येक दिवस कर्मचारी हा रस्त्यावरती उतरला आहे त्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी एसटी चे विलीनीकरण राज्यशासनामध्ये झाले पाहिजे तसेच त्यांची पगार वाढ झाली पाहिजे तसेच त्यांच्या इतर मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष कायम कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहील अशी कर्मचाऱ्यांना या आंदोलनाच्या निमित्ताने ग्वाही दिली तसेच एसटी आगार व्यवस्थापकाने संप मोडीत काढण्याचा जबरदस्ती परत असा अगावपणा केल्यास रस्त्यावरती एक ही बस सुस्थितीत राहणार नाही, एस टी. बस चे नुकसान झाल्यास त्यास आगार व्यवस्थापक जबाबदार राहील तसेच संप मोडीत काढण्याचा प्रयन केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाकडून जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनासह कागल आगार आणि राज्य प्रशासनाला दिला. यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष बाबासो कागलकर, कार्याध्यक्ष बी. आर कांबळे, तालुका सचिव सचिन मोहिते, मातंग आघाडी अध्यक्ष अण्णाप्पा आवळे, जयवंत हळदीकर, साताप्पा हेगडे, तानाजी सोनाळकर, निशिकांत कांबळे तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!