कागल : देशाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे अध्यक्ष खास. शरद पवार साहेब यांच्यावर गलिच्छ कविता करणारे अॕड.भावे व सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या केतकी चितळे यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीच्या वतीने कागल पोलिस निरिक्षक जाधव साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या अशी बदनामी खपवून घेतली जाणार नाही व पिढ्यानपिढ्या समाज भडकवणा-या या प्रवृतीचा वेळेच बंदोबस्त करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर साहेब,शहर अध्यक्ष संजय चितारी, शहर राष्ट्रवादी काॕग्रेस महिला अध्यक्ष पद्मजा भालबर, शहर युवक अध्यक्ष सागर गुरव, प्रविण काळबर, नितीन दिंडे, विवेक लोटे, सुनील माने, नवाज मुश्रीफ, पंकज खलिफ, इरफान मुजावर,गंगाराम शेवडे, दिलीप ढोबळे व बच्चण कांबळे, राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.