कोल्हापूर : सारथी संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर येथील सारथी उपकेंद्राला 12 जून 2025 रोजी शासनाकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेला निधी प्राप्त झाला असून, त्यामधून 203 विद्यार्थ्यांना एकूण ₹4 कोटी 13 लाख 47 हजार 144 रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
या रकमेमध्ये 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील अधिछात्रवृत्ती तसेच 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील घरभाडे आणि आकस्मिक खर्चाचा समावेश आहे. सध्या कोल्हापूर उपकेंद्राकडून कोणतीही शिष्यवृत्ती रक्कम प्रलंबित नाही, अशी माहिती सारथीच्या सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी दिली.

“छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजना” ही मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विशेष प्रोत्साहन देण्यासाठी सारथीमार्फत कार्यान्वित आहे.
कोल्हापूर उपकेंद्रांतर्गत 2019 ते 2023 या काळात चार विद्यापीठांमधून 427 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळते, ज्यामध्ये सुरुवातीच्या दोन वर्षांसाठी दरमहा ₹37,000 आणि त्यानंतरच्या तीन वर्षांसाठी दरमहा ₹42,000 दिले जातात. याशिवाय, नियमानुसार घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्चही दिला जातो.
Trying out AI Chat made my workflow way smoother – it’s great for quick ideation and task automation. Definitely worth checking if you’re into AI tools!