पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती

पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती; पंकजा मुंडेंचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय

मुंबई, २१ मे: पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहिरात प्रसिद्ध केली असून, इच्छुकांना २० जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Advertisements

रिक्त पदांमुळे कामात येणारे अडथळे दूर होणार

Advertisements

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासाठी मागणीपत्र सादर करण्यात आले होते. आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या ३११ पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवण्यात आले आहे.

Advertisements

कामास येणार गती, पशुपालकांना मिळणार उत्तम सेवा

या भरतीमुळे पशुसंवर्धन विभागाला सक्षम आणि नवीन अभ्यासू अधिकारी मिळतील. यामुळे ग्रामीण भागातील पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक वेगाने आणि पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होईल, तसेच पशुपालकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळेल, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मुंडे यांनी पाठपुरावा केला आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!