हुपरी येथील क. आवाडे जवाहर कारखाण्या जवळील घटना
हुपरी : ११ जानेवारी ते १७ जानेवारी या काळात रस्ते सुरक्षा सप्ताह असतो. रस्ता सुरक्षा सप्ताह सर्वत्र साजरा केला जात आहे. पण त्यामागील हेतू उद्देश काही केला वाहनचालक लक्षात घेत नाहीत.
यामध्ये माल वाहतूक करणारे चालक सर्वात पुढे आहेत. माल वाहतूक करताना काही किरकोळ बाबीकडे दुर्लक्ष करून मोठे नुकसान व जीवित हानी करून घेतात.
आज हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याजवळ एक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या एका बाजूचा लोखंडी रॉड निसटून त्या बाजूच्या ऊस मुळ्या या रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने जाणाऱ्या वाहनास वाहतुकीस अडथळा करीत होत्या. त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. तरी सदर कारखान्यानी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालकांना समज देऊन रस्ता सुरक्षा कायद्याचे पालन करण्यास सांगावे अशी नागरिकांची मागणी आहे.
सदर घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा