मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड शहर नागरिक संघात ३१ आक्टोबर २०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी संचालक गणपतराव सिरसेकर यांचे हस्ते प्रतिमापूजन तसेच जेष्ठ नागरिक सदाशिव भारमल यांच्या हस्ते दिपप्रजलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत इंजिनिअर सदाशिवराव एकल यानी केले.

यावेळी जेष्ठ नागरिक विनायक हावळ यानीं माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे विविध विचार व त्यानां जगातील विविध देशाकडून प्राप्त झालेले सन्मान व आपल्या देशातील सर्वोच्य असा “भारतरत्न” सन्मानाबाबत सविस्तर माहिती उपस्थिताना दिली.
या कार्यक्रमास एम. टी. सामंत, सिकंदर जमादार, आर. डी. चौगले, मा. सा. गोधडे, श्रीकांत निकम, किशोर पाटील, सुरेश दरेकर, दादू बरकाळे, शिवाजीराव सातवेकर, प्रदिप बागल, बाबूराव कापशे, प्रकाश ढाणे, गणपती सिरशेकर, सदाशिव भारमल, प्राध्या. चंद्रकांत जाधव, यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार जयवंत हावळ यानीं मानल.