कागल (विक्रांत कोरे): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत सन 2021- 22 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्या मंदिर लिंगनूर दुमाला शाळेचा विद्यार्थी कुमार रणवीर आनंदा संकपाळ यांने 298 पैकी 278 गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला.
या यशाने तो शिष्यवृत्तीधारक बनला. कुमार रणवीर यास वर्गशिक्षक विकास चौगुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी.बी. नाईक,सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले. या यशाने रणवीरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.