मुरगूड (शशी दरेकर ): प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही मुरगूड ता. कागल येथे रंगपंचमीचा आनंदोत्सव विविध भागात साजरा करण्यात आला. रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण, या दिवशी एकमेकानां वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. यावेळी विविध रंगाची उधळण केली जाते, त्याचबरोबर विविध रंगांचे चुर्ण पाण्यात मिसळून ते पाणी बालचमू पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडवून आनंद व्यक्त करत होते.

मुरगूडमध्ये विविध भागात बालचमूसह तरूणाई, महिलासह आबालवृद्ध विविध रंगाची उधळण करताना दिसून आले.. त्याचबरोबर अनेक भागात तरुणाई स्टेरिओ लावून गाण्यांच्या तालात तल्लीन होत रंगांची उधळण करतानां दिसून आला. यामध्ये विविध मंडळांचाही सहभाग होता.

एकंदरीत रंगपंचमीचा हा उत्सव शांततेने व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मुरगूड पोलिसानीही चोख बदोबस्त ठेवला होता.