साके (प्रतिनिधी) : लेखक हे शांतीचे उपासक असतात ते आपल्या लेखनातून नेहमीच समाजाला आर्दशवत घडविण्याचा प्रयत्न करतात.विविध लेख,कथा,कादंबरी या सारख्या लिखानाच्या माध्यमातून झोपलेल्या समजाला शब्द भंडाराने जागे करून चांगल्या विचारांचा प्रसार करण्याचे काम करतात असे प्रतिपादन लेखक कृष्णात खोत यांनी सांगितले.
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ,कोल्हापूर शाखा – कागल, शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने बाचणी ता.कागल येथे लेखक, प्रा. प्रकाश सोनाळकर यांनी लिहीलेल्या ‘राजगृहाच्या खिडकीतून’ या कादंबीचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ अभ्यासक डॅा.गिरीश मोरे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे,डॅा. विनोद कांबळे,राजेंद्र कांबळे,अंतराष्ट्रीय व्हॅालीबॅाल कोच प्रा.अजित पाटील प्रमुख उपस्थित होते.
स्वागत कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांनी केले. सोनाळकर यांनी लिहिलेले कळावं कादंबरी,प्रवर्तन कथासंग्रह यांस जिल्हा स्तरावरील विविध पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.
यावेळी प्रकाश सोनाळकर यांच्या ‘राजगृहाच्या खिडकीतून’ या कादंबीचे प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत, ज्येष्ठ अभ्यासक डॅा.गिरीश मोरे ,सारिका कासोटे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे पुजन करून झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. तानाजी आसबे, प्रा.अजित पाटील, विद्याधर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास उत्तम पाटील,आल्लाबक्ष शहाणेदिवाण, व्ही.डी.चौगुले,सुनील पोवार,तानाजी सोनाळकर, रविंद्र सारंग, श्रीकांत कांबळे, एम.डी.कांबळे, सुरेश पाटील, आयलू देसा, बाळासाहेब खामकर, प्रज्ञा पाटील, विद्या पोवार, रमेश कांबळे, सरदार काळे, अजित भोसले, बाप्पा चौगुले आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन शिवाजी पाटील यांनी केले आभार संजय चिखलीकर यांनी मानले.