बाचणी(तानाजी सोनाळकर) : कागल तालुक्यातील मागासवर्गी्यांना दिले जाणारे जातींचे दाखले रीतसर अर्ज करून देखील सर्वच जातीच्या लोकांना वारंवार तहसीलदार कार्यालय व प्रांत कार्यालय यांचेकडे हेलपाटे मारून देखील वेळेत जातींचे दाखले दिले जातं नाहीत, कुटुंबतील एकाची जातपडताळणी दाखला असताना देखील शासननिर्णय असतानादेखील जातीच्या दाखल्यावर वारंवार भरमसाठ शेरे मारले जातं आहेत यामुळे कागलं तालुक्यातील असंख्य जातींचे दाखले प्रलबीत आहेत, फक्त कागल तालुक्यामध्ये असंख्य दाखले प्रलबीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन वेळेत दाखले दिले जातं नसल्याने त्यांचे आर्थिकही नुकसान होत आहे आणि शैक्षणिक प्रवेश रद्द होत आहे त्यामुळे कुटुंबंतील नातेवाईकांची जातपडताळणी असताना ते कुटुंबं त्याच जातींचे सिद्ध झालं असताना सुद्धा प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी त्रुटी काढतात ही पद्धत अत्यंत चुकीची व मनमानी आहे त्यामुळे सर्व बाबीचा विचार करून मा. प्रांत अधिकारी यांनी विनाविलंब मागासवर्गीयांचे जातींचे दाखले द्यावेत अन्यथा रिपब्लिकन स्टाईलने जातींचे दाखले घेणेत येतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) यांनी दिला.
यावेळी कागल तालुका पदाधिकारी कागल तालुका अध्यक्ष बाबासाहेब कागलकर, कागल तालुका कार्याध्यक्ष बी. आर. कांबळे, कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहिते, कागल तालुका युवा उपाध्यक्ष तानाजी सोनाळकर, कागल तालुका उपाध्यक्ष आणासो आवळे, कागल तालुका चिटणीस जयवंत हळदीकर यांच्यासह RPI चे पदाधिकारी उपस्थित होते.