मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर शहरामध्ये राज्यभिषेक दिना दिवशी काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस वायरल केले होते याचा निषेध म्हणून मुरगूड शहरमधील शिवप्रेमी यांनी मुरगूड येथील शिवतीर्थ येथे या घटनेचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिना दिवशी घडलेल्या या प्रकाराने वातावरण तणावाचे बनले होते.
यावेळी दगडु शेणवी यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरी मध्ये अशे कृत्य करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम काही मंडळी करत आहेत पोलिस प्रशासन यांनी कडे लक्ष घालून या प्रकाराला टाळा घातला पाहिजे.
यावेळी सर्जेराव भाट यांनी ही मनोगत व्यक्त केलं यावेळी मुरगूड पोलिस स्टेशन चे एपीआय विकास बडवे यांनी निवेदन स्वीकारले त्यांनी बोलताना सांगीतले की मुरगूड शहराला छत्रपती शाहू महाराज यांच्या सलोख्याचा वारसा आहे कोणी अशे प्रकार घडल्यानंतर नागरिकांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका कौतुकास्पद आहे तसेच कोल्हापूर येथे झालेल्या घटनेतील आरोपी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी युवराज सूर्यवंशी, सुशांत मांगोरे, ओंकार पोतदार,जगदीश गुरव, धोंडीराम परीट,अरुण मेंडके, निशांत जाधव ,मयूर सावर्डेकर, अभी मिटके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते