
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्याला जादा दर द्यावेत तसेच सकल मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी करण्यात येणारी आंदोलने, साखळी उपोषण तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण इ. साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 (The Maharashtra Police Act, 1951) चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्या पासून ते दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी मनाई आदेश जारी केला आहे.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्याच्या संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.