मुरगूड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. महादेव कानकेकर यांची निवड उपाध्यक्षपदी जे के कुंभार तर सचिवपदी संदीप सर्युवंशी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मुरगूड प्रतिनिधी, माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी जोतीराम कुंभार( दै. जनमत) तर सचिवपदी संदीप सुर्यवंशी( दै. हॅलो प्रभात) यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. रविंद्र शिंदे( दै तरूण भारत) होते.

Advertisements

          या बैठकीस प्रा. सुनिल डेळेकर( दै. पुढारी), प्राचार्य शाम पाटील( दै. पुढारी), अनिल पाटील( दै. लोकमत), प्रकाश तिराळे( दै. सकाळ),दिलीप निकम( दै. महासत्ता),अविनाश चौगले( दै. सामना), प्रविण सुर्यवंशी( दै. महानकार्य),समीर कटके( दै. जनप्रवास), भैरवनाथ डवरी( दै. केसरी), शशी दरेकर ( गहिनीनाथ समाचार), राजू चव्हाण( दै. बंधूता), ओंकार पोतदार( दै. रोखठोक), विजय मोरबाळे( निकाल न्युज), सर्जेराव भाट( टी व्ही नेक्स्ट ), ॲन्थोनी बारदेस्कर ( विशेष निमंत्रित ) उपस्थित होते.

Advertisements

यावेळी मागील कामाचा आढावा घेऊन येत्या वर्षभरात विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. स्वागत प्रवीण सुर्यवंशी यांनी केले, प्रास्ताविक प्रा. रविंद्र शिंदे यांनी केले, तर आभार संदीप सुर्यवंशी यांनी मानले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!