वडगाव(सुहास घोदे) : वडगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी युवक क्रांती महायुतीच्या वतीने श्रीमती प्रविता शिवाजीराव सालपे यांची उमेदवारी सर्वानुमते कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीती ठरविण्यात आली. लवकरच नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्याचे प्रक्रियाही निश्चित करण्यात आली.
या बैठकीस कमिटीचे आघाडीचे ज्येष्ठ नेते रंगराव पाटील , सुकुमार पाटील , माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी ,आघाडीचे सचिव प्रा. अविनाश तेली, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवाजी राजे व्यापारी नागरी सह.पत संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय कदम ,अशोक झगडे,सुधीर पोळ ,माजी नगरसेवक रमेश शिंपणेकर, चंद्रकांत साबळे, जितेंद्र शहा, गौतम मोरे, नामदेव झगडे, बबलू खाटीक, आदी कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते उपस्थित होते.

आघाडीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अजय दादा थोरात हे पूर्वनियोजित कामासाठी पुणे येथे गेले आहेत. या बैठकीवेळी त्यांनी दूरध्वनी वरून सर्व उपस्थिताना सांगितले की, सालपे वाहिनी यांची उमेदवारी आम्ही सर्वांनी सहमतीने निश्चित केली आहे.