सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छता मोहीम

मुरगूड ( शशी दरेकर ): सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा दिनाचे औचित्य साधून स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमात “स्वच्छ परिसर – सुंदर परिसर” हा संदेश देत प्लास्टिक निर्मूलन व पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्यात आली.

Advertisements

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छता ही फक्त एक मोहीम नसून जीवनशैली बनली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. दीपक साळुंखे यांनी स्वयंसेवकांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांची माहिती देऊन प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पर्यायी साधनांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.राष्ट्रीय सेवा दिन आपल्याला फक्त स्वच्छतेची नव्हे तर जबाबदारीची आठवण करून देतो. ही जबाबदारी आहे ,आपल्या पृथ्वीला, आपल्या पर्यावरणाला आणि आपल्या पुढच्या पिढीला वाचविण्याची. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिक टाळूया, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारूया,आणि इतरांनाही या चळवळीत सामील करूया अशी शपथ घेतली.याच्यातूनच खरी राष्ट्रीय सेवा घडेल.

Advertisements

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा संजय हेरवाडे, प्रा दिगंबर गोरे, प्रा डॉ पी आर फराकटे, प्रा सुशांत पाटील, प्रा स्वप्निल मेंडके, प्रा धनाजी खतकर, प्रा सुहास गोरूले, प्रा राहुल बोटे, प्रा संदीप मोहिते प्रा अर्चना कांबळे, प्रा दिपाली सामंत, प्रा सोनाली कुंभार आदी उपस्थित होते.

Advertisements

यावेळी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील वृक्ष ,बगीचे, प्रांगण, ग्रंथालय परिसर, मुख्य इमारतीच्या समोरील भाग आदी ठिकाणी स्वच्छता केली. प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला.या उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी समाजहिताचे भान प्रकट केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापकवृंद व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!