विनयभंग केल्याप्रकरणी संशयित व्यक्तीस अटक

कागल/ प्रतिनिधी : कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथील विद्यामंदिर व्हन्नाळी या शाळेतील बाल विद्यार्थिनींचा लैंगिक खेळ केला. मुलींना पट्टीने हातावर पायावर मारहाण केली, त्यांच्या अंगावर वह्या फेकणे या कारणावरून तेथील एकावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुळशीदास सदाशिव माने राहणार बामणी तालुका कागल असे संशयित आरोपीचे नाव आहे.

Advertisements

आरोपी माने हा अल्पवयीन पीडित मुलींचा विनयभंग करीत असे. शाळेच्या बाथरूम मध्ये जाऊन तो फोटो काढत असे कोणास सांगितला तर बघा असा तो दम द्यायचा. मुलींच्या पाण्याच्या बाटल्या फोडायचा. मारहाण करून त्रास द्यायचा. मुलींना पट्टीने मारहाण करायचा. माझा कोणीही पगार बंद करू शकत नाही, कोणीही माझं काहीही वाकड करणार नाही अशा आशयाची तक्रार पीडित मुलींच्या पालकांनी कागल पोलीस ठाण्याकडे केली आहे.

Advertisements

कागल पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक करपे मॅडम पुढील तपास करीत आहेत सदरच्या घटनेने व्हन्नाळी परिसरातील विद्यार्थिनींच्या पालकातून संतापाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

Advertisements
AD1

1 thought on “विनयभंग केल्याप्रकरणी संशयित व्यक्तीस अटक”

Leave a Comment

error: Content is protected !!