मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड बाजारपेठेतील श्री जैन श्वेतांबर मंदीरे येथे श्री. वासुपूज्य भगवान मुळनायक काच मंदीर म्हणजे मुरगूड परिसरामध्ये एक सुंदर, कलात्मक, नाविन्यपूर्ण असे मंदिर म्हणून खास अशी ओळख आहे.
“पर्चुषण पर्व ” उत्सवानिमित्य गेल्या आठ दिवसापासून भक्तीमय वातावरणात मंदीरामध्ये दररोज विविध पूजा , स्नान पूजा , वाचन , नयनरम्य आंगी याचबरोबर सायंकाळी आरती , भावना ( भक्ती गीते ) , दांडिया रास , गर्भनृत्ये असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. या पर्व निमित्य जैन श्वावक -श्राविकांच्या विविध तपश्चर्या झाल्या.
“पर्युषण पर्व ” मध्ये संवत्सरी दिवशी जीव प्राण्यांची क्षमा याचना मागून पर्व संपन्न झाले. या पर्व निमित्य मंदीराला आकर्षक सजावटीने विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या कार्यक्रमात रविवारी रथ- बंग्गी, बँन्ड वाद्य, तपस्वी, दांडीया नृत्य अशी मुख्य बाजारपेठेतून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. संपूर्ण शहरामध्ये शोभायात्रा दरम्यान लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या शोभायात्रेमध्ये मुरगूडसह, बानगे, सोनगे, बिद्री, राशिवडे येथिल जैन बांधव, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.