कागल पंचायत समितीमध्ये पंचायत राज दिन साजरा

कागल  (विक्रांत कोरे) : कागल पंचायत समिती मध्ये 24 एप्रिल रोजी पंचायतराज दिन गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले.

Advertisements

यामध्ये स्वच्छता, विविध विषयांवर मार्गदर्शन, स्क्रीन वरती लाईव्ह पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन, सेवा हक्क कायदा याविषयी जनजागृती करण्यात आली.

Advertisements

यावेळी बोलताना सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने दिनांक 24 एप्रिल 1993 रोजी 73 व्या घटनादुरुस्तीने संविधानिक स्वरूप प्राप्त होऊन त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली. ज्यांच्यामुळे गाव पातळी पासून सर्व जाती-धर्माच्या लोकांचा सहभाग करून पंचायतीचा कारभार करण्याबाबत बंधनकारक झाले. याची फलोत्पती म्हणून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्व समाजांना, सर्व जनसामान्यांना सामावून घेऊन कामकाज करत आहोत. असे ते म्हणाले. यावेळी कृषी विस्ताराधिकारी आप्पासो माळी, अमित माळगे यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisements

कार्यक्रम प्रसंगी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे,  विस्ताराधिकारी दिलीप माळी, अमोल मुंडे, सहाय्यक लेखा अधिकारी राजेश बर्डे, कक्षा अधिकारी ए.जी. पाटील, संगीता काळे,  अमेय चिले, शबाना मुल्ला, प्रदीप रजपूत आदि. अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित होते. आभार विस्ताराधिकारी दिलीप माळी यांनी  मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!