निधन वार्ता – ईश्वरा खराडे

शिंदेवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक ह .भ.प . ईश्वरा दत्तु खराडे रा. शिंदेवाडी ता. कागल यांचे मंगळवार दि. १२/०८/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. १३/०८/२०२५ रोजी सकाळी ९ वा  वैकुंठ स्मशानभूमी शिंदेवाडी येथे आहे.

स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श युवकांनी घ्यावा व अदर्श राजकारणी बनावे – प्रा. पांडुरंग सारंग

केनवडे (वार्ताहर) : स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श युवकांनी घ्यावा व अदर्श राजकारणी बनावे असे परखड मत प्रा.पांडुरंग सारंग यानी व्यक्त केले ते चिखली (नानीबाई)येथे पत्रकार संतराम पाटील यानी लिहिलेल्या स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देवर्षी यांचे जीवन चरीत्राचे पुस्तक प्रकाशन समारंभाच्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलत आसताना केले 9ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी दैनिक … Read more

लोकशाही दिनात नागरिकांनी सहभाग घ्यावा – तहसिलदार अमरदिप वाकडे

कोल्हापूर (जिमाका) :तालुका प्रशासनामार्फत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात सकाळी ११:०० वाजता लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या दिवशी नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरूपात दोन प्रतीत सादर कराव्यात. संबंधित विभागाचे अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्य नागरिक, विविध सामाजिक संस्था, व ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४८ दिनांक ११-०८-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २६ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

गोरगरीब, सामान्य, कष्टकरी माणसाचे जीवन कसे सुखी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

संजय गांधी निराधार समितीच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप कागल (विक्रांत कोरे) : तीस वर्षे तुम्ही संधी दिल्यामुळेच इतके मोठे काम करू शकलो .अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. या ऋणातून मुक्त होण्यासाठी गेली 25 30 वर्षे मी प्रयत्न करतोय. गोरगरीब सामान्य कष्टकरी माणसाचे जीवन कसे सुखी होईल त्यांच्या यातना कशा कमी करता येतील यासाठी माझा … Read more

डॉ.श्रीकृष्ण देखमुख (काका) यांना मुरगूड भूषण पुरस्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे  प्रवचनकार  व अध्यात्मिक गुरु डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांना स्वातंत्र्यदिनी मुरगूड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.     शिवम प्रतिष्ठान, कराड चे प्रणेते विख्यात विचारवंत इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते हा सन्मान मुरगूडकर नागरिकांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे.     डॉ. श्रीकृष्ण देशमुख  यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय  … Read more

कागलची कन्या रिया ठेंगेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

कागल (प्रतिनिधी) :  रांची येथे होणाऱ्या फ्रीस्टाईल महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी रिया रामचंद्र ठेंगे हिची निवड झाली आहे.ती कागल येथील डी आर माने महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बीए च्या तृतीय वर्षातील वर्गात ती शिकते आहे.           महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित 23 वर्षीखालील महाराष्ट्र राज्य संघ निवडचाचणी कुस्ती (महिला) रिया हिने फ्रीस्टाइल कुस्ती 50 … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतिदिनानिमित्त ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात देशभक्ती आणि प्रबोधन पर कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे कार्यतत्पर प्राचार्य डॉ शिवाजी होडगे यांच्या हस्ते गारगोटी स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्याला पुष्पहार … Read more

निधन वार्ता : गोरखनाथ तुकाराम सावंत यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी : शिंदेवाडी (ता कागल ) येथील गोरखनाथ तुकाराम सावंत (वय ५८ ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.  त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , मुलगा व मूलगी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन उद्या रविवार (दि.१० ) रोज़ी शिंदेवाडी येथे आहे.

शिवराज विद्यालयाच्या विद्यार्थिनिनी पोलिसानां राख्या बांधून रक्षाबंधन सण केला साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ): बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. आज या सणाचे औचित्य साधून शिवराज विद्यालय मुरगूडच्या हरित सेनेच्या विद्यार्थिनींनी मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधनसणाचा सण उत्साहात साजरा केला . पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे अशक्य असते. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या … Read more

error: Content is protected !!