करवीर: प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेले टाटा हिताची EX110 पोकलँड आता खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. १० लाख रुपये मूल्यांकन असलेली ही मालमत्ता १५ मे २०२५ रोजी करवीर तहसील कार्यालयात जाहीर लिलावात विक्रीसाठी ठेवली जाईल. इच्छुक खरेदीदारांनी लिलावाच्या अटी व शर्तींची नोंद घ्यावी. वेळेत एक चतुर्थांश रक्कम भरून या संधीचा लाभ घेता येईल.
लिलावाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :
1. मालमत्तेचे मूल्यांकन : टाटा हिताची EX110 पोकलँड यंत्राची मूल्यांकन किंमत रुपये १०,००,०००/- (रुपये दहा लाख) इतकी निश्चित करण्यात आली असून यापेक्षा कमी बोली स्वीकारली जाणार नाही.

2. लिलाव प्रक्रिया : लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल. ज्याच्या नावावर लिलाव मंजूर होईल, त्याने लिलाव रक्कमेच्या १/४ (एक चतुर्थांश) रक्कम तात्काळ भरावी लागेल. उर्वरित ३/४ (तीन चतुर्थांश) रक्कम, लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलाव धारकास समज दिल्यापासून तीन दिवसांच्या आत भरावी लागेल.
3. अधिभार व फेरलिलाव : जर लिलाव धारकाने वेळेत संपूर्ण रक्कम भरली नाही, तर फेरलिलाव करण्यात येईल. त्यामध्ये बोली रक्कम कमी आल्यास, ती तफावत पूर्वी भरलेल्या १/४ रकमेतून वजा केली जाईल.
4. थकबाकीदाराची संधी : लिलावास पूरक असलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत थकबाकीदाराने संपूर्ण थकबाकी, नोटीस फी, लिलाव खर्च इत्यादी भरून सक्षम अधिकाऱ्याकडे लिलाव रद्द करण्याची विनंती केल्यास, लिलाव ज्याच्या नावावर मंजूर झाला आहे, त्यास बोली रक्कमेच्या ५% रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल.
5. मालमत्तेचा ताबा : लिलाव सक्षम अधिकाऱ्याकडून मंजूर झाल्यानंतर लिलाव धारकास विक्री प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्या आधारे प्रत्यक्ष मालमत्तेचा ताबा दिला जाईल.