मुरगूड ( शशी दरेकर ) :
ट्रक्टर खड्यात कोसळून झालेल्या अपघातात एकजण ठार तर अन्य सहाजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे
आठ वाजता बेलेवाडी मासा तालूका कागल येथे घडली. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.
या घटने बाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी की लखाप्पा व्हळ्याप्पा डोळीन वय ३८ रा. हुनबुंटी तालूका मुद्देविहार जिल्हा विजापूर हा स्वराज्य ट्रक्टर KA-28 TC 9780 या ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूला पाण्याची टाकी जोडून बोळावीवाडी ते बेलेवाडी मासा या रस्त्याने चालला होता. भरधाव वेगामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने बेलेवाडी मासा तालूका कागल जिल्हा कोल्हापूर गावच्या हद्दीतील ज्ञानदेव आदमापुरे यांच्या शेताजवळील खड्यात ट्रक्टर कोसळला. या अपघातात उमेश अशोक मोरे रा. बाळोली तालुका इंडी , जिल्हा विजापूर हा मयत झाला. तर मल्लाप्पा सिदराम्मा संगेगी, राम दोडननी, माळाप्पा दासाप्पा तेली तिघेही रा. बाळोली तालूका इंडी जिल्हा विजापूर, स्वामलींग दलवाई, गुंदवान तालूका इंडी, जिल्हा विजापूर, इरान्ना पाटील रा. इब्राहिमपूर तालूका सिंदगी जिल्हा विजापूर, प्रशांत भानतु भंगारगुठ रा. केसरपूर तालूका मुद्देविहाळ जिल्हा विजापूर हे जखमी झाले.
मुरगूडचे सपोनि शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जरग तपास करत आहेत.
