मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दि. १ आक्टोंबर ३२ वा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक किरण गवाणकर होते.
प्रारंभी संघाचे सदस्य माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, सदस्य पार्वती चांदेकर यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सदस्य विनायक हावळ यांनी सर्वांचे स्वागत करून इशस्तवन गायिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संघाचे जेष्ठ सदस्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी प्रास्ताविकात जागतिक नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांच्या जागतिक चळवळीचा संक्षिप्त आढावा घेतला . ज्येष्ठाच्या समस्या अडचणी ,ज्येष्ठांचे कायदे व मिळणाऱ्या सवलती याबाबत माहिती दिली. ज्येष्ठांची चळवळ जोमाने वाढायचे असेल तर ज्येष्ठ नागरिक संघास शासनाने दरवर्षी किमान ५० हजार अनुदान द्यावे. जेष्ठांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन तसेच ज्येष्ठ नागरिक शासकीय योजनांचा लाभ घेतील. त्यांनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य होणे बंधनकारक करावे अशा प्रमुख मागण्या मांडल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक गजानन सरगर, अध्यक्ष किरण गवाणकर, प्राचार्य पी डी माने यांचा संघाचे अध्यक्ष गंगापूरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे सरगर यांच्या हस्ते ७५ वर्षीय जेष्ठांचा सत्कार करण्यात आला . सदस्य श्रीमती मालूताई पोवार हिच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त सौ विद्यागौरी हावळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .याप्रसंगी संघाच्या सदस्यांचा वाढदिवसा निमित्त गुलाब पुष्प अर्पण पेढा भरून सत्कार करण्यात आला .एकेरी कॅरम स्पर्धेचे बक्षीस वितरण अध्यक्ष किरण गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोनि. गजानन सरगर यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले . जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व ज्येष्ठांच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी संघाच्या कार्यास पी डी माने , किरण गवाणकर, गजानन सरगर , रेवती मानकर , रोहिणी पाटील , आनंदा चांदेकर , महादेव वागवेकर ,मधुकर मंडलिक इत्यादींनी देणग्या देऊन आर्थिक हातभार लावला .सदस्य चंद्रकांत दरेकर यांनी सहा प्लास्टिक खुर्च्या भेट देण्याचे अभिवचन दिले.
शेवटी सदस्य रामचंद्र सातवेकर यांनी सर्वांचे आभार मानले .सूत्रसंचालन जयवंत हावळ यांनी केले . कार्यक्रमास दलितमित्र डी . डी .चौगले, चंद्रकांत जाधव तसेच संघाचे संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .