मुरगूड (शशी दरेकर) : येथील वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतीने संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba ) पुण्यतिथी निमित्त रविवार दि-२६ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त आरोग्य विभाग कर्मचारी, कष्टकरी ज्येष्ठांचा सत्कार, निराधार निराश्रीतांना ब्लॅकेंट वाटप याबरोबरच शाश्वत विकासाचे सेवाधर्म संस्थापक संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba ) या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ . सुभाष देसाई हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाश्वत विकास चळवळीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जून कुंभार गारगोटी उपस्थित राहणार असल्याची माहीती वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांनी दिली.
यावेळी प्रमुख उपस्थिती नामदेव मेंडके,दत्तमामा खराडे, रंजना मंडलिक, सुहास खराडे, दामोदर वागवेकर, आण्णासो थोरवत, एम टी सामंत, वसंतराव रसाळ, प्राचार्य बी आर बुगडे, राहुल बंडकर, सदाशिव एकल, प्रा.अनिल पाटील, एम डी रावण आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.