मुरगूड ( शशी दरेकर ):
मुरगूड ता . कागल येथिल सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेत जनरल मॅनेंजर पदावर कार्यरत असणारे नवनाथ बाबासो डवरी यांची कोल्हापूर जिल्हा पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली.
या निवडीबद्दल नवनाथ डवरी यांचा श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्था व मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यानां पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडीच्या सत्कार प्रसंगी लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे सभापती किशोर पोतदार, उपसभापती दत्तात्रय कांबळे, संचालक जवाहर शहा, पुंडलिक डाफळे, दत्तात्रय तांबट, अनंत फर्नांडिस, चंद्रकांत माळवदे, रविंद्र खराडे, विनय पोतदार , रविंद्र सणगर, सौ. सुजाता सुतार, सौ. सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे यांच्यासह सेवक वृंद, उपस्थित होते.


तसेच श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यानीही डवरी यांचा सत्कार करून अभिनंदन केले. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. व्यापारी नागरी सह संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, व्हा.चेअरमन प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री प्रशांत शहा, किशोर पोतदार, साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर, हाजी धोंडीबा मकानदार, निवास कदम, संदिप कांबळे, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह सुरेश जाधव ,दिपक वारके कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.