गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे. गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.

Advertisements

या निवडीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे, या निवडीमुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्या गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीने सतेज पाटील यांना धक्का देत डावच उलटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Advertisements

अध्यक्षपदासाठी नाविद मुश्रीफ यांच्यासोबत अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील आणि अजित नरके यांची नावेही चर्चेत होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांच्या दबावामुळे आणि रणनीतीनुसार, अखेर नाविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Advertisements

यापूर्वी अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने ‘गोकुळ’चे अध्यक्षपद चर्चेचा विषय बनले होते. मात्र, नेत्यांच्या प्रयत्नांमुळे डोंगळे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. महायुतीने अध्यक्षपदावर आपलाच दावा करत, जोरदार लॉबिंग केले होते.

या निवडीनंतर नाविद मुश्रीफ यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. ‘गोकुळ’च्या पुढील वाटचालीसंदर्भात नाविद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कोणत्या दिशा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment

error: Content is protected !!