मडिलगे प्रतिनिधी (जोतीराम पोवार) – महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वाघापूर तालुका भुदरगड येथे ज्योतिर्लिंगाची नागपंचमी लाखो भाविकांच्या उपस्थित साजरी झाली पहाटे पाच वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सौ विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
सकाळी कुंभार वाड्यातून मानाची नागमूर्ती मंदिरात आणण्यात आली यावेळी महिलांनी दूध लाह्या तेल साखर अर्पण करून मनोभावे पूजा केली गेले आठ दिवस मंदिर समितीच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती.

यावेळी गारगोटी राधानगरी व कागल एसटी आजारातून भाविकांसाठी जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी भुदरगड पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी देवस्थान समितीच्या सर्व सदस्यांसह, गुरव समाज, ग्रामस्थ यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.