मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संघाच्या विरंगुळा केंद्रात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे होते.

संघाचे उपाध्यक्ष पी .डी. मगदूम यानी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक जयवंत हावळ यानीं प्रास्ताविक केले. यावेळी महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन पी.डी. मगदूम यांच्या हस्ते तर लालबहादूूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण सचिव सखाराम सावर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या थोर विभूतींच्या स्मृतीनां उजाळा देत सर्वानीं आदरपूर्वक जयजयकार केला.

संघाचे सदस्य प्रा. चंद्रकांत जाधव व प्रा. किशोर पाटील यानीं गांधीजी व शास्त्रींच्या जीवन कार्याची माहिती देत सत्य, अहिंसा, साधी रहाणी उच्च विचारसरणी या त्यांच्या अंगिकारामुळे संपूर्ण जगात म. गांधी व शास्त्री श्रेष्ठ व वंदनिय ठरले असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमावेळी सदस्य शिवाजीराव सातवेकर, सदाशिव एकल, मधुकर सामंत, अशोक डवरी, सिकंदर जमादार, महादेव वागवेकर, पांडूरंग पाटील, गणपती सिरसेकर, लक्ष्मण गोधडे, आनंदा चांदेकर, सदाशिव यादव, दादू बरकाळे, रामचंद्र रणवरे यांच्यासह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.