मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर १ कोटी ७३ लाखावर ठेवीचे केले संकलन

कर्ज स्वरूपात फोर व्हिलर, टू व्हिलर अशा ५० गाड्यांचे केले कर्जवितरण

मुरगूड ( शशी दरेकर ): स्व. खा. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या अशिर्वादाने व मा. खासदार संजयदादा मंडलिक तसेच युवानेते ॲड. विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी मुरगूड ता. कागल येथिल सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि .२२/ १०/ २०२५ रोजी

Advertisements

मुख्य शाखेबरोबर शाखा सावर्डै बु.,  सदाशिवनगर, कापशी, बाचणी, सिद्धनेर्ली, कुर, सरवडे येथिल शाखेकडे सभासद, ठेवीदार, हितचिंतकानी दिपावली पाडव्यानिमित्य १ कोटी ७३ लाख ९६ हजार ९९६ इतके ठेवीचे संकलन केले आहे. तसेच दिपावली पाडव्यानिमित्य संस्थेने कर्ज स्वरूपात फोर व्हिलर, व टू – व्हिलर अशा ५० गाड्यांचे कर्ज वितरण केले.

Advertisements

या कामी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, शाखाधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!