मुरगूड येथिल “आक्काताई धुमाळ” यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर )


मुरगूड येथिल बाजारपेठ येथे राहणारी श्रीमतीआक्काताई पांडूरंग धुमाळ यांचा ७१वा वाढदिवस मोठया उत्साहाच्या वातावरणात नुकताच संपन्न झाला.

सासू -सुनेचे प्रेम हे एक गुंतागुंतीचे पण, सुंदर नाते आहे. ज्यात अनेकदा गैरसमज आणि भांडणे होतात. पण योग्य समजुतदारपणा, आदर आणि प्रेम असल्यास ते मैत्रीसारखे घट्ट आणि विश्वासाचे नाते बनू शकते.
जिथे सासू ,सुनेला आईचे प्रेम देते त्यामुळे नात्यात एक वेगळाच आपुलकीचा आणि विश्वासाचा बंध निर्माण होतो. जिथे सूनही सासरी कुंटूबांचा आधार बनून राहते.

पतीचे छ्त्र – हरपलेल्या शितल सुभाष धुमाळ यानीं आपल्या आईचे प्रेम देणाऱ्या सासुबाई आक्काताई धुमाळ यांचा ७१वा वाढदिवस पै – पाहुणे, शेजारांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात साजरा केला. त्यांचे सासू -सुनेच्या नात्याचे प्रेम समाजासाठी आदर्शवत आहे असे गौरवउदगार उपस्थितातून प्रकट झाले.

वाढदिसाच्या निमित्ताने त्यानां दिर्घायुष्य लाभो अशी पै- पाहुणे, मित्रपरिवानीं ईश्वरचणी प्रार्थना केली .
या वाढदिवासावेळी पै- पाहुणे यांच्यासह मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होता.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!