मुरगूडच्या श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेला ३ कोटी ३९ लाख २ हजारावर निव्वळ नफा – सभापती किशोर पोतदार

१५३ कोटी ठेवींचा संस्थेत ठेवीदारानीं पाडला पाऊस

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील सुवर्ण महोत्सवी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेला ३ कोटी ३९ लाख २ हजार ६०१ रुपयांचा ऐतिहासिक विक्रमी निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री. किशोर पोतदार यानी दिली.

Advertisements

संस्थेच्या ६० वर्षाच्या इतिहासात एवढा विक्रमी नफा मिळण्याची ही आनंददायी व संस्थेसाठी अभिमानाची अशी घटना असून २०२४-२५ वर्षाच्या तुलनेत यंदाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण ६७ लाख २ हजार रुपये इतकी वाढ झालेची पोतदार यानीं सांगितले .
पोतदार पुढे म्हणाले संस्थेच्या मुख्य शाखेसह कुर ( ता.भुदरदगड ) ,
सरवडे ( ता. राधानगरी ) , सावर्डे बु॥ ( ता. कागल ) , सेनापती कापशी ( ता. कागल ) , आणि शेळेवाडी ( ता. राधानगरी ) अशा एकूण ६ शाखा कार्यरत आहेत . या सर्व शाखाअंतर्गत एकूण १५३ कोटी ४७ लाख ९० हजारावर ठेवी असुन १२० कोटी ६२ लाख ९५ हजारावर कर्ज वाटप झाले आहे .

Advertisements

ते म्हणाले संस्थेची वार्षिक उलाढाल ४९७ कोटी ९३ लाख २८ हजारावर आहे . तर संस्थेचे खेळते भांडवल २३३ कोटी २२ लाख इतके विक्रमी झाले आहे . संस्थेकडील ३४१८ सभासंदाचे २ कोटी १९ लाख ६ हजारावर भागभांडवल जमा असून ६ कोटी ७३ लाख ६ हजारावर स्वनिधी आणि ४ कोटी ८५ लाख ५३ हजार राखीव निधी आहे . तर संस्थेची ५६ कोटी ९ लाख ७३ हजारांची सुरक्षित गुंतवणूक असुन थकबाकीचे प्रमाण ० टक्के आहे .एन.पी. ए .० टक्के तर सी .डी. रेशो ७० टक्के इतका आहे.

संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत उपसभापती दत्तात्रय कांबळे तसेच जेष्ठ संचालक जवाहर शहा, पुंडलिक डाफळे , अनंत फर्नांडिस, दत्तात्रय तांबट , रविंद्र खराडे , विनय पोतदार , चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे , संचालिका सौ . सुजाता सुतार , सौ . सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत जनरल मॅनेंजर  नवनाथ डवरी , सचिव मारूती सणगर , वेगवेगळ्या शाखेतील शाखाधिकारी रामदास शिऊडकर , तुकाराम दाभोळे , के.डी. पाटील , अनिल सणगर, बाळासो पाटील , सौ . मनीषा सुर्यवंशी यांच्यासह सर्व सेवक वृंदांचे , सभासद, ठेवीदार , व प्रामाणिक कर्जदारांचे बहुमोल सहकार्य लाभले असल्याचे त्यानीं सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!