व्याख्यानमालेचे ३७ वे वर्ष
मुरगूड ( शशी दरेकर ) : वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात येणारी ३७ वी व्याख्यानमाला येथील माननीय विश्वनाथराव हरिभाऊ पाटील खुले नाट्यगृह, हुतात्मा तुकाराम चौक येथे शनिवार दिनांक ११ एप्रिल ते मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे.
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ही व्याख्यानमाला भारतीय राज्यघटनेतील मूल्ये, विज्ञानवादी दृष्टीकोन, समाजवाद व धर्मनिरपेक्षता यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रबोधनपर उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शनिवार, ११ एप्रिल २०२६ :
वक्ते : संपत देसाई
विषय : महात्मा फुले व आजची शिक्षण व्यवस्था
अध्यक्ष : सागर येवारे
रविवार, १२ एप्रिल २०२६ :
वक्ते : डॉ. आनंद मेणसे (बेळगाव)
विषय : मनुस्मृतीचे दहन व चवदार तळ्याचा सत्याग्रह
अध्यक्ष : नामदेवराव मेंडके
सोमवार, १३ एप्रिल २०२६ :
वक्ते : प्रा. डॉ. भारती पाटील (कोल्हापूर)
विषय : भारतातील विद्रोही परंपरा
अध्यक्ष : सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ :
वक्ते : डॉ. राजेंद्र कुंभार
विषय : भारतीय संविधान व आजचे वर्तमान
अध्यक्ष : देवानंद पाटील
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार उपस्थित राहणार आहेत. समाजातील विविध विषयांवर जनजागृती घडवून आणणारी ही व्याख्यानमाला गेली ३७ वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येत असून, तरुणांच्या विचारांना दिशा देणारा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजवादी प्रबोधिनी, मुरगूड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.